शिवराज्याभिषेक सोहळा यापुढे राष्ट्रीय सण - तटकरे
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून त्यांचा राज्याभिषेक सोहळा यापुढे राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते तसेच हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी बोलताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांवर महाराजांचे उत्सव साजरे करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीची अजिबात गरज नसून प्रत्येक किल्ल्यावरील दगडधोंडे ,मातीमध्ये शिवभक्तांच्या भावना गुंतल्या असल्याने त्यांच्याशी खेळू नका अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील ,असा इशारा दिला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते तसेच हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रांतून शिवभक्त गडावर डेरेदाखल झाले होते. शनिवारी दुपारपासून राज्याभिषेक सोहळय़ानिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या हस्ते महाराजांची विधीवत पूजा, अभिषेक करण्यात आल्यानंतर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.
No comments:
Post a Comment