किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेक तारखेनुसार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले आहेत.
राजदरबारातील मेघडंबरीत असलेल्या पुतळ्यावर महाराष्ट्रातल्या पंच नद्यातून आणलेल्या पाण्यानं जलाभिषेक, दुग्धाभिषेक, मुद्राभिषेक करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील मावळे, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, ढोल ताशांचा गजर आणि पालखी मिरवणूक हे या सोहळ्याचं खास वैशिष्टय आहे